जिल्हा कारागृहात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा
जिल्हा कारागृहात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा
बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : कारागृहात
नातेवाईकांपासून दूर असलेल्या बंद्यांना सणाची उणीव भासू नये, तसेच आनंदी आणि खेळीमेळीचे
वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने महिला सदस्यांनी सर्व बंद्यांना व कारागृह कर्मचाऱ्यांना
राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
अपर
पोलीस महासंचालक तथा कारागृह सुधारसेवा डॉ. सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक
योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा जिल्हा कारागृहात विविध सेवाभावी संस्थांच्या
सहकार्याने धार्मिक, सामाजिक, मनोरंजनात्मक व समुपदेशपर उपक्रम राबविले जातात. रक्षाबंधन
सणानिमित्त प्रजापिता ब्रम्हा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, बुलडाणा यांच्या वतीने
कारागृहातील बंद्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. या प्रसंगी
भाई रंजनीकांत व डॉ. लता बाहेकर यांनी बंद्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. तसेच उर्मिला
दीदी, पुनम दीदी, सुशांत सुरुशे, सुषमा गवई, जयश्री इंगळे, अर्चना बोरले यांनी मार्गदर्शनपर
विचार मांडले.
कार्यक्रमाच्या
यशस्वी आयोजनासाठी कारागृह अधीक्षक मेघा शंकर बाहेकर, उमेश नाईक (तुरुंगाधिकारी), दरेसिंग
चव्हाण(सुभेदार), दिनेश डोंगरदिवे, राहुल जाधव, सचिन वाढे, विशाल राजगुरु, नितीन नरोटे
व कारागृह शिपाई यांचे सहकार्य लाभले.
00000
Comments
Post a Comment