अन्न व औषध प्रशासनामार्फत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम
अन्न व औषध प्रशासनामार्फत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम
बुलडाणा, (जिमाका) दि. 11 : सणासुदीच्या
पार्श्वभूमीवर राज्यभर “सण महाराष्ट्राचा, संकल्प
अन्न सुरक्षेचा” या टॅगलाईनखाली अन्न
व औषध प्रशासनामार्फत विशेष तपासणी मोहीम सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री
ना. नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार
आज बुलढाण्यात मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
उद्घाटनाच्या
दिवशी श्री गणेश बिग्गाजी बिकानेर स्वीट मार्ट, जुना अजीसपुर रोड, सागवण, बुलढाणा येथे
तपासणी करून वैध अन्न परवाना नसल्याचे आढळले. संबंधित आस्थापनास परवाना मिळेपर्यंत
व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. यावेळी सहाय्यक आयुक्त(अन्न) पी. एस.
पाटील, पोलीस उपाधीक्षक (गृह) बी. डी. पावरा, सहकार अधिकारी एम. ए. पोले, अन्नसुरक्षा
अधिकारी नि. म. नवलकार व जी. के. वसावे तसेच पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी मोरे उपस्थित
होते.
अन्न
व्यवसाय चालकांना वैध परवाना घेणे, स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळणे, ताज्या व परवानाधारक
विक्रेत्याकडूनच कच्चा माल घेणे, दुग्धजन्य पदार्थ 4°C पेक्षा कमी तापमानात साठवणे
आणि जुना किंवा खराब खवा/मावा टाळणे यासारख्या महत्त्वाच्या सूचना विशेष तपासणी मोहिमेदरम्यान
देण्यात आल्या. सणासुदीत नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ पुरवावेत,
असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने सर्व अन्न व्यवसाय चालकांना केले. तसेच नियमाचे पालन
न करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविण्यात आले
आहे.
000000
Comments
Post a Comment