महसुल सप्ताहानिमित्त आज मोताळा येथे मार्गदर्शन शिबीर; नागरिकांनी लाभ घ्यावा
महसुल सप्ताहानिमित्त आज मोताळा येथे मार्गदर्शन शिबीर; नागरिकांनी
लाभ घ्यावा
बुलढाणा, दि.6 (जिमाका) : राज्य
शासनाच्या निर्देशानुसार दि. 1 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यभर महसूल सप्ताह साजरा
करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरीकांच्या शासकीय कामकाजाशी संबंधित अडचणी दूर
करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाच्या वतीने मोताळा तहसील कार्यालय येथे आज दि. 7 ऑगस्ट
रोजी सकाळी 11 ते 1 यावेळेत विशेष मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा
नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भूमि अभिलेख उपअधीक्षक यांनी केले आहे.
या
शिबीरामध्ये नागरीकांना भूमि अभिलेख विभागाशी संबंधित विविध कामांबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन
करण्यात येणार आहे. यामध्ये शेतजमीन मोजणी अर्ज, नकाशा किंवा अभिलेखाची नक्कल मिळविण्याचे
अर्ज, तसेच मालमत्तेशी संबंधित फेरफार अर्ज-वारस लावणे, खरेदीने नोंद, बोजा नोंद, हक्क
सोडलेख, बक्षीसपत्र नोंद आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नागरिकांनी शासकीय
कार्यालयातील कामकाजासंदर्भातील माहिती मिळवून आपली कामे सुलभपणे पार पाडावी यासाठी
या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment