जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे गाळे माजी सैनिकांना भाडेतत्त्वावर उपलब्ध
जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालयाचे गाळे माजी सैनिकांना भाडेतत्त्वावर उपलब्ध
बुलडाणा,(जिमाका)
दि. 8 : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या
विधवा तसेच वीरपत्नी यांना व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालयाच्या अधिनस्थ गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येत आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज
16 ऑगस्ट 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे सादर करावेत, असे
आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या
अधिनस्थ मेन रोडवरील सात गाळे भाडेतत्त्वावर उपलब्ध असून प्रत्येक गाळ्याचा आकार
10 बाय 20 फूट आहे. गाळयाचे भाडे 12 हजार रुपये प्रतिमहिना (विद्युत बिल व्यतिरिक्त)
असेल. इच्छुकांनी आपले अर्ज मुदतीत जमा करावेत. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले
जाणार नाहीत.
कार्यालयाचे गाळे भाडे तत्वावर देण्याकरीता
प्राध्यान्यक्रम माजी सैनिक किंवा माजी सैनिक विधवा यांची नोंदणीकृत बँक किंवा पतसंस्था, माजी सैनिक/विधवा(वैयक्तिक व्यवसाय) व माजी सैनिक
महिला बचत गट या प्रमाणे राहिल. गाळ्यांच्या
वाटपासाठी एका वर्षाच्या भाड्याएवढी सुरक्षा अनामत रक्कम (Security Deposit) भरावी
लागेल. भाडेकराराचा कालावधी दोन वर्षांचा राहील व करारनामा जिल्हा निबंधक कार्यालयात
नोंदवावा लागेल. मंजूर अर्जदारांनी ठरवलेल्या अटी व शर्तींनुसार करार करणे बंधनकारक
राहील, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment