भारतीय डाक विभागाची दीन दयाल फिलॅटेली शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावा

 

भारतीय डाक विभागाची दीन दयाल फिलॅटेली शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 06 : भारतीय डाक विभागामार्फत देशभरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकीट संकलन (Stamp Collection) या छंदाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी दीन दयाल फिलॅटेली शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये फिलॅटेलीविषयी (टपाल तिकीट संकलन कला) रुची निर्माण व्हावी, या हेतूने ही शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेअंतर्गत भारतभरातून 920 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून प्रत्येकी 6 हजार वार्षिक शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे.

 

दीन दयाल शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी  31 ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्या जवळच्या टपाल कार्यालयात संपर्क साधून अर्ज सादर करावा.  इयत्ता 6 वी ते 9 वीमधील सर्व शालेय विद्यार्थी शिष्यवृत्तीकरिता पात्र असेल. विद्यार्थ्यांची स्पर्धा व गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाईल. विद्यार्थ्यांमध्ये पत्रव्यवहार आणि डाक विभागाविषयी जाणीव, आवड व सर्जनशीलता वाढवणे हा मुख्य उद्देश आहे.

जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीबाबत योग्य मार्गदर्शन करून, छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन डाक विभागाचे डाक अधीक्षक गणेश बा. आंभोरे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या