पोलीस मुख्यालयात अवयव दान जनजागृती अभियान संपन्न

 

पोलीस मुख्यालयात अवयव दान जनजागृती अभियान संपन्न

बुलडाणा, (जिमाका) दि. 12 :  अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत येथील पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानात अवयव दान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  मार्गदर्शक डॉ. लध्दड व त्यांची संपूर्ण टीमने अवयव दानाचे महत्त्व व प्रक्रिया संदर्भात जनजागृती केली.

जनजागृती कार्यक्रमात कृत्रिम श्वसन पद्धत (CPR) प्रशिक्षण देण्यात आले. तसेच अवयव दानाचे महत्त्व, प्रक्रिया व सामाजिक बांधिलकीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थितांना अंगदानाच्या माध्यमातून होणारे जीवदान व समाजातील या उपक्रमाची गरज यावरही प्रकाश टाकण्यात आला.

            याप्रसंगी पोलिस निरीक्षक श्री. पावरा, राखीव पोलिस निरीक्षक विकास तिडके, पोलिस निरीक्षक दिनकर गावीत, जि.वि.मा.अ. राजेश धुताडमल, डॉ. प्रवीण घोंगटे, डॉ. शिंदे(DPS), नेत्र समुपदेशक योगेश शिरसाट, सौरव हिवाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास पोलिस कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या