जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी विशेष रक्तदान शिबी
जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी विशेष रक्तदान शिबीर
सहकार
विद्यामंदिर येथे आयोजन ; बुलढाणावासियांनी रक्तदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
बुलढाणा, दि.८
(जिमाका) : जिल्ह्यातील गरजू रुग्णांना
रक्ताचा पुरवठा होण्याकरिता जिल्हा प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी सहकार विद्यामंदिर येथे विशेष रक्तदान शिबीर आयोजित
करण्यात आला आहे. या रक्तदान शिबिरात बुलढाणावासियांनी
उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी
केले आहे.
हा विशेष रक्तदान शिबीर सकाळी ९.३० वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु
राहणार आहे. जिल्ह्यातील तरुण-तरुणी, रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात जास्त जास्तीत
संख्येत सहभाग नोंदवून गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करण्यासाठी रक्तदान करुन प्रशासनाला
सहकार्य करावे, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांनी केले.
00000
Comments
Post a Comment