जिल्हा रुग्णालयात अवयवदान पंधरवड्याला सुरुवात Ø अवयवदान जनजागृती रॅलीला उत्सफूर्त प्रतिसाद
जिल्हा
रुग्णालयात अवयवदान पंधरवड्याला सुरुवात
Ø
अवयवदान जनजागृती रॅलीला उत्सफूर्त प्रतिसाद
बुलढाणा, दि. 5 (जिमाका) : जिल्हा
सामान्य रुग्णालय येथे 3 ते 15 ऑगस्ट या कालावधीत अवयवदान जनजागृती पंधरवडा
राबविण्यास सुरुवात झाली असून भव्य रॅलीने या पंधरवड्याचा उत्साहात प्रारंभ
करण्यात आला. "अंगदान जीवन संजीवनी" या अभियानांतर्गत आयोजित या रॅलीस
शहरवासीयांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.
या
उपक्रमाचे आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार व जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
अवयवदानाविषयी समाजात जनजागृती निर्माण व्हावी, अंगदानाच्या महत्त्वाविषयी
नागरिकांमध्ये समज वाढावी व गैरसमज दूर व्हावेत, या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली
होती.
अवयवदान
जनजागृती पंधरवड्यात हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे, डोळे, ऊती यांसारख्या
अवयवांचे दान हे दुसऱ्याचे जीवन वाचवू शकते, “अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान” या उद्देशाने सर्व नागरिकांनी अवयवदानासाठी संमती फॉर्म भरुन
अवयवदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात
उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना अंगदानाची शपथ देण्यात आली. रॅलीमध्ये जिल्हा
रुग्णालयातील नर्सिंग विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी
यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या
रॅलीमध्ये नर्सिंग अधिकारी प्राचार्य खेडेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धोंगटे,
नेत्रतज्ञ डॉ. साईनाथ तोडकर, तसेच नेत्र विभागातील सर्व कर्मचारी,
अधिसेविका, मेट्रन व इतर आरोग्य कर्मचारी यांनी सक्रीय सहभाग घेतला.
000
Comments
Post a Comment