कृषी विभागामार्फत ‘शाश्वत शेती दिन’ उत्साहात साजरा
कृषी विभागामार्फत ‘शाश्वत शेती दिन’ उत्साहात साजरा
बुलडाणा,(जिमाका) दि. 8 : हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या
जन्मशताब्दी निमित्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, प्रकल्प संचालक (आत्मा),
कृषी विज्ञान केंद्र व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत शेती
दिन’ साजरा करण्यात आला.
डॉ.
अमोल झापे (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र) यांनी शाश्वत शेतीचे
नियोजन व व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले, तर डॉ. निलेश कानवडे (वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ,
कृषी संशोधन केंद्र) यांनी शाश्वत शेतीचे महत्त्व उलगडून सांगितले. शेतकरी महेश जाधव
व विशाल धनावत यांनी आपल्या प्रत्यक्ष अनुभवांची मांडणी केली.
कार्यक्रमाची
सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी नावीन्यपूर्ण व
शाश्वत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकातून
डॉ. स्वामिनाथन यांच्या कार्याचा परिचय प्रकल्प संचालक (आत्मा) पुरुषोत्तम उन्हाळे
यांनी करून दिला.
अध्यक्षीय
भाषणात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीकडे
वळण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक बुटे यांनी तर आभार
प्रदर्शन अनुराधा गावडे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी,
शेतकरी उत्पादक कंपनी संचालक, शेतकरी गटांचे सदस्य तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment