जागतिक स्कूल हॅालिबॅाल चॅम्पियनशिप; 15 वर्षाआतील मुला-मुलींकरीता निवड चाचणी
जागतिक स्कूल
हॅालिबॅाल चॅम्पियनशिप; 15 वर्षाआतील मुला-मुलींकरीता निवड चाचणी
बुलडाणा, (जिमाका)
दि. 07 : चीनमध्ये आंतरराष्ट्रीय
शालेय खेल महासंघाद्वारे 15 वर्षाआतील मुलामुलींसाठी जागतिक स्कूल हॅालिबॅाल चॅम्पियनशिप
होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार असुन भारतीय संघाची निवड करण्यासाठी
भारतीय शालेय खेल महासंघाने राष्ट्रीय निवड चाचणीचे आयोजन दि.25 ते 30 ऑगस्ट या कालावधीत
श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगी बालेवाडी, पुणे या ठिकाणी करण्यात आले आहे.
या स्पर्धेतसाठी जिल्ह्यातील उत्कृष्ठ खेळाडूंची निवड करून पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी
दि.11 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकूल, बुलढाणा येथे निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
राष्ट्रीय निवड चाचणीत राज्याचे खेळाडु सहभागी होणार असून राज्याचा निवड चाचणी
संघ निश्चित करण्यात राज्य निवड चाचणीचे आयोजन ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात श्री. शिवछत्रपती
क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे या ठिकाणी करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी थेट विभागीय निवड चाचणीचे आयोजन दि. 14 ऑगस्ट
2025 पूर्वी करुन प्रत्येक विभागातून उत्कृष्ट 5 मुला-मुलींची निवड करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय निवड चाचणी दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा क्रीडा
संकुल, जांभरुन रोड बुलढाणा येथे घेण्यात येणार आहे. चाचणीस येतांना खेळाडूंनी जन्मतारखेचा
दाखला, आधारकार्ड, जनरल रजिस्टरची सत्यप्रत किंवा निर्गम उतारा या कागदपत्रांसह उपस्थित
रहावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस. महानकर यांनी कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment