खामगावं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांची विविध पदावर निवड
खामगावं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांची
विविध पदावर निवड
बुलढाणा, दि.7 (जिमाका)
: सतगुरू
श्री अगाशे काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगांव येथील शिल्प कारागिर प्रशिक्षण
योजनेअंतर्गत सन २०१७ ते २०२२ या कालावधीत विविध व्यवसायात प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी
आपली यशस्वी वाटचाल करत शासकीय व खाजगी क्षेत्रात विविध पदांवर निवड मिळवली आहे.
विशेषतः विजतंत्री व तारतंत्री व्यवसायातील २०२०, २०२१
व २०२२ साली प्रवेशित प्रशिक्षणार्थी महावितरणमध्ये विद्युत सहायक या महत्त्वाच्या
पदावर कार्यरत झाले आहेत. या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांमध्ये पवन जामोदे, गौरव चव्हाण,
शिवराज हागे, विकास ठाकरे, मयुर गव्हाळे, संदेश गोळे, शितल पारसकर, संजना वानखेडे,
ज्योत्सना भोजने, गजानन वाघमारे, आशिश तेलगोटे, आकाश पातोंड, कु. शितल राठोड, पंकज
वाकोडे, कु. चंचल तायडे, कु. साक्षी सुरवाडे, कु. स्नेहा तेलगोटे, कु. वैशाली आखरे
व कु. रोशनी खरले यांचा समावेश आहे. तसेच, फाउंड्रिमॅन व्यवसायात २०१८ व २०१९ मध्ये
प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थी अभय शिवदास राउत, शुभम एकनाथ बोरडे व सुमेध सुरेश
बोदडे यांची रेल्वे टेक्निशियन आणि ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये टेक्निशियन पदांवर नियुक्ती
झाली आहे, ही बाब संस्थेसाठी अत्यंत गौरवास्पद आहे.
या सर्व यशामध्ये संस्थेचे प्राचार्य श्री. एस. डी. गंगावणे,
उपप्राचार्य श्री. व्हि. व्हि. काळे, गटनिदेशक श्री. जे. व्हि. काळे, श्री. व्हि. के.
सुपे, श्री. एन. एस. गावडे, श्री. व्हि. एस. भोजने, श्री. डि. जे. वानखडे, शिल्पनिदेशक
श्री. ए. बि. माडीवाले, श्री. एस. जि. तायडे, श्री. एस. ए. खापर्डे व इतर सर्व शिल्पनिदेशक
यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेतील सर्व कर्मचारीवृंदांनी या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचे
अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा
आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या व मार्गदर्शक निदेशकांचे मनःपूर्वक आभार मानले.
000000
Comments
Post a Comment