आरोग्य विभागात “राष्ट्रीय अवयवदान दिन” उत्साहात साजरा

 

आरोग्य विभागात राष्ट्रीय अवयवदान दिन उत्साहात साजरा

बुलडाणा,(जिमाका) दि. 8 :  जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय येथे राष्ट्रीय अवयवदान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात अंगदान जीवन संजीवनी अभियान दि. 3 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलींद जाधव, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रंजित मंडाले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे, प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र पुरी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, नेत्रतज्ञ डॉ. शिंदे, नेत्र समुपदेशक योगेश शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अवयवदान ही माणुसकीची सर्वोच्च अभिव्यक्ती असून मरणानंतरही अनेकांना नवजीवन देण्याची ही संधी समाजासाठी वरदान आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. अमोल गिते यांनी केले. त्यानंतर प्रशांत पवार(आ.स.) यांनी अवयवदानाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी संदेशामुळे उपस्थितांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. यावेळी एकूण 21 कर्मचाऱ्यांनी अवयवदान फॉर्म भरून सहभाग नोंदवला.

कार्यक्रमात सर्व मान्यवर व कर्मचारी यांनी अवयवदान शपथ घेतली व या जनहितकारक उपक्रमाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जि.वि.मा.अ. राजेश धुताडमल यांनी विशेष परिश्रम घेतले.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या