राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान योजना; १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान योजना; १० ऑगस्टपर्यंत
मुदतवाढ
बुलढाणा, दि. 2 (जिमाका) : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कला व
साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी ‘राजर्षी शाहू
महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना’ राबविण्यात येते. पात्र जेष्ठ
साहित्यीक व कलावंतांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात
आली आहे. या योजनेच्या लाभासाठी ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी अर्ज करावेत, असे आवाहन
करण्यात आले आहे.
पात्र
लाभार्थ्यांनी https://mahakalasanman.org/pgeApplicationFromForUser.aspx लिंकवर जाऊन
ऑनलाईन अर्ज भरावा. तसेच आपले सरकार पोर्टलवरूनही अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन अर्ज
भरल्यानंतर अर्जाची दोन प्रिंटआउट प्रती संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयात
कार्यालयीन वेळेत व मुदतीत सादर करणे आवश्यक आहे.अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड,
उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, बँक पासबूक, लागू असल्यास पती व पत्नीचा
एकत्रित फोटो, दिव्यांगत्व असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला, राज्य, असल्यास केंद्र सरकार
पुरस्कार प्रमाणपत्र, नामांकित संस्था, व्यक्ती यांचे शिफारस पत्र असल्यास तसेच अन्य
पुरावे जोडावेत.
0000
Comments
Post a Comment