बुलढाण्याचा राष्ट्रीय सन्मान !
स्वातंत्र्य दिनासाठी बोथा येथील वनीता बोराडे यांना राष्ट्रपती भवनाकडून विशेष आमंत्रण
बुलढाणा, दि. 4 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे आयोजित "ॲट होम रिसेप्शन " या समारंभासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील बोथा येथील सोयरे वनचरे फाउंडेशनच्या वनीता जगदेव बोराडे यांना विशेष आमंत्रण पाठविण्यात आले आहे.
हे आमंत्रणपत्र असलेली पार्सल पिशवी वनीता बोराडे यांच्या पत्त्यावर पाठविण्यात आली असून, ही बाब बुलढाणा जिल्ह्यासाठी गौरवाची आहे.
पार्सल वितरणाची कार्यवाही डाक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. वितरणाच्या माहितीसाठी मेहकर उपविभागीय डाक निरीक्षक जी. बी. काळे, डाकघर सहायक अधीक्षक कै. का. तायडे यांना संपर्क साध्ण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment