जिल्हा कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय सन्मान

 



जिल्हा कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय सन्मान

बुलडाणा,(जिमाका) दि. 8 :  महाराष्ट्र कारागृह विभागातील सन 2024-2025 या वर्षासाठी उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेसाठी बुलढाणा जिल्हा कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय सन्मान प्राप्त झाला आहे. यामध्ये दिनकर वामनराव मैंद व वैभव पांडुरंग राणे यांना राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक(कारागृह व सुधारसेवा) डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते पुणे येथे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

दिनकर वामनराव मैंद हे मागील 22 वर्षांपासून कारागृह विभागात प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्यरत आहेत. त्यांनी बुलढाणा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला अशा विविध कारागृहांत उत्कृष्ट सेवा बजावली असून सध्या बुलढाणा जिल्हा कारागृहात कार्यरत आहेत.

वैभव पांडुरंग राणे हे मागील 17 वर्षांपासून कारागृह विभागात कार्यरत असून बुलढाणा, नाशिक, बीड, धुळे या कारागृहांत उल्लेखनीय सेवा दिली आहे. सध्या तेही बुलढाणा जिल्हा कारागृहात आपली सेवा बजावत आहेत.या सन्मानामुळे बुलढाणा जिल्हा कारागृहाचा गौरव वाढला असून सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या