स्थानिक निधी लेखापरिक्षा दिन उत्साहात साजरा; आरोग्य संवर्धन विषयक मार्गदर्शन सत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद

 स्थानिक निधी लेखापरिक्षा दिन उत्साहात साजरा;

आरोग्य संवर्धन विषयक मार्गदर्शन सत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलढाणा, दि.6 (जिमाका): स्थानिक निधी लेखापरिक्षा दिन म्हणून दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर स्थानिक निधी लेखापरिक्षा कार्यालय, बुलढाणा येथे आरोग्य संवर्धन या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शन सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्थानिक निधी लेखापरिक्षा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पंडीतराव मांडोगडे, निवृत्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रल्हाद ताठे, निवृत्त सहायक संचालक दिनकर बावस्कर आणि संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजेश वडतकार यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचा एक विशेष आकर्षण म्हणजे आरोग्य संवर्धन विषयक मार्गदर्शन सत्र होय. या सत्रात डॉ. अश्विनी जाधव यांनी दैनंदिन जीवनशैलीतील छोटे-छोटे बदल, व्यायाम, आहार आणि मानसिक आरोग्य यावरील मार्गदर्शन दिले. चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विकारांपासून संरक्षण कसे मिळवावे, याचे सखोल विवेचन त्यांनी केले.

कार्यक्रमाला संघटनेचे जिल्हाध्यक्ष व कार्यालय अधीक्षक दीपक सावंत, जिल्हा सचिव गोपाल ढोले, राज्य कार्यकारिणी महिला प्रतिनिधी मिरा ठाकरे, कोषाध्यक्ष सागर बोकडे, सहसचिव किशोर पवळ, सल्लागार संदीप साखरे, मार्गदर्शक प्रकाश पाटील, गणेश साबळे यांच्यासह अनेक सदस्य व स्थानिक अधिकारी/कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्था.नि.ले.परिक्षा  सहायक संचालक देविदास पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन कनिष्ठ लेखापरिक्षक डिगंबर बावस्कर व कनिष्ठ लेखापरिक्षक गोपाल पाफळणारे यांनी आभारप्रदर्शन केले.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या