सहकारी संस्थांकडून सहकार पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित; 18 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 

सहकारी संस्थांकडून सहकार पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित; 18 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

बुलढाणा, दि.6 (जिमाका) :  राज्य शासनाच्या सहकार विभागामार्फत राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना सहकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यासाठी आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील कामगिरीच्या आधारे संस्थांची निवड केली जाणार आहे.

सदर निवड प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम पूर्वी घोषित करण्यात आला होता. मात्र, संस्थांना अधिक वेळ मिळावा या उद्देशाने दुसऱ्यांदा या कार्यक्रमात बदल करण्यात आला असून, पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सहकार पुरस्काराशी संबंधित सविस्तर माहिती सहकार विभागाच्या संकेतस्थळावर http://sahakarayukta.maharashtra.gov.in तसेच जिल्हा उपनिबंधक व तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात उपलब्ध आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत आणि पात्र असलेल्या सहकारी संस्थांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव, आवश्यक कागदपत्रांसह, स्वतःच्या तालुक्यातील सहाय्यक निबंधक कार्यालयात १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन , सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण यांनी केले आहे.        

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या