जिल्हा स्त्री रुग्णालयात बाल हृदयरोग तपासणी शिबीर संपन्न
जिल्हा स्त्री रुग्णालयात बाल हृदयरोग तपासणी शिबीर
संपन्न
बुलढाणा, दि.6 (जिमाका) : राष्ट्रीय
बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालय, बुलडाणा येथे दि. 5 ऑगस्ट
2025 रोजी बालकांचे हृदयरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी तज्ज्ञांव्दारे
हृदयरोग संदर्भात मार्गदर्शन करुन 113 बालकांची हृदयरोग तपासणी करण्यात आले.
या
शिबीरासाठी सत्यसाई हॉस्पिटल, खारघर-मुंबई येथून आलेल्या विशेष तज्ज्ञांच्या पथकाने
बालकांची सखोल तपासणी केली. शिबीरात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील राष्ट्रीय बाल
स्वास्थ कार्यक्रमांतर्गत प्राथमिक तपासणीत संदर्भित करण्यात आलेल्या बालकांची पुढील
तपासणी करण्यात आली. शिबीरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी
मार्गदर्शन करताना तपासणीअंती शस्त्रक्रियेस पात्र ठरणाऱ्या बालकांसाठी अॅक्शन प्लॅन
तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या
शिबीरात जिल्हा स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून
उपस्थित होते. शिबीराचे आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा समन्वयक दिलीप नरवाडे आणि व्यवस्थापक डॉ. जुनेद मिर्झा यांनी
महत्त्वपूर्ण योगदान दिले.
00000
Comments
Post a Comment