जिल्हास्तरीय नेहरू हॉकी कप स्पर्धा संपन्न
जिल्हास्तरीय नेहरू हॉकी कप स्पर्धा संपन्न
बुलडाणा, (जिमाका) दि. 06 : जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय, क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा हॉकी संघटना व सहकार
विद्यामंदिर बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नेहरू हॉकी कप स्पर्धेचे
आयोजन सहकार विद्यामंदिर, बुलढाणा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 15 वर्षांखालील
मुले, 17 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटांमध्ये जिल्ह्यातील एकूण 14 संघांनी सहभाग
घेतला. तीनही गटांमध्ये झालेल्या रंगतदार सामने आणि उत्कट सहभागामुळे स्पर्धा अतिशय
यशस्वी ठरली.
या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्या मधून
उत्कृष्ट खेळाडूला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेमधून विविध गटामध्ये
उत्कृष्ट खेळाडूं, विजयी व उपविजयी संघाना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस
वितरन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस. महानकर, सहकार विद्या मंदिर स्कुलचे मुख्याध्यापक
अरुण पवार तसेच जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव प्रकाश खेत्रे, सहकार विद्या मंदिरचे क्रीडा
प्रमुख सय्यद अबिद, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी डॉ.मनोज निकस, जिल्हा फुटबॉल
संघटनेचे सदस्य सुनिल जोशी, राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. जीवन मोहोड, सहकार विद्या
मंदिरचे हॉकी प्रशिक्षक पुजांजी होन यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यसाठी पंच
म्हणून सय्यद अबिद, प्रकाश खेत्रे, पुंजाजी होन, निलेश पवार, जयश्री शिंदे, तसेच जिल्हा
सामान्य रुग्णालयाचे ज्ञानेश्वर पंखुले व गणेश साबळे यांनी प्रमुख भुमिका बजावली. स्पर्धेमधून
विविध गटामध्ये खालील उत्कृष्ट खेळाडुंना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
15 वर्षा
आतील मुलांच्या गटातील उत्कृष्ट खेळाडू : उत्कृष्ट गोलकिपर-अश्विनी दिवटे, उत्कृष्ट
डिफेन्डर - शिवराज साबळे, उत्कृष्ट मिडफिल्डर- समयक आंभोरे, उत्कृष्ठ फॉरवर्ड -प्रज्वल
खिल्लारे
17 वर्षा आतील मुलांच्या गटातील उत्कष्ट खेळडू : उत्कृष्ट गोलकिपर- दक्षा
तलरेजा, उत्कृष्ट डिफेन्डर - ओम वटाने, उत्कृष्ट मिडफिल्डर-देवेश राऊत, उत्कृष्ठ फॉरवर्ड
-पियुष आधांळे.
17 वर्षा आतील मुलींच्या गटातील उत्कष्ट खेळडू : उत्कृष्ट गोलकिपर-आरूषी
वायाळ, उत्कृष्ट डिफेन्डर - चैताली सदार, उत्कृष्ट मिडफिल्डर-स्नेहा मापारी, उत्कृष्ठ
फॉरवर्ड -कोमल भोंडे.
000000
Comments
Post a Comment