‘हर घर तिरंगा’ मोहिम; विविध उपक्रमांचे आयोजन

 

‘हर घर तिरंगा’ मोहिम; विविध उपक्रमांचे आयोजन

 

बुलढाणा, दि.8 (जिमाका) :  स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविण्यात येणार आहे. यात तीन टप्प्यात विविध उपक्रमांचे आयोजन कारण्यात आले आहे. या मोहिमेत नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

पहिल्या टप्यात 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान शाळा, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी तिरंगा प्रेरित सजावट. हर घर तिरंगा 2025 या हॅशटॅगसह सोशल मीडीयावर फोटो शेअर करणे, तिरंगा रांगोळी स्पर्धा-कार्यशाळा, तिरंगा राखी बनवण्याच्या स्पर्धा, अंगणवाडी, शाळा, वृध्दाश्रम, मॉल्स यामध्ये तिरंगा विषयक प्रश्नमंजूषा, शाळांमध्ये जवानांसाठी पत्रलेखन उपक्रम, ‘हर घर तिरंगा - हर घर स्वच्छता’ अभियान हे 8 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवून स्वच्छता व पाणी संजीवनीवर विशेष भर देण्यात येणार आहे. स्वयंसेवक कार्यक्रमात प्रचारकांनी घरोघरी तिरंगा पोचवणे व जनजागृती करण्यात येणार आहे.

 

दुसऱ्या टप्प्यात 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय तिरंगा महोत्सव, तिरंगा मेला व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, तिरंगा बाईक व सायकल रॅली, तिरंगा यात्रा व मानवी साखळ्या, तिरंगा विक्री स्थानिक उत्पादक व स्वयं सहायता गटांचा सहभाग, मिडीया व सोशल मिडीयात हॅशटॅगसह प्रसिद्धी-प्रचार, प्रत्येक घरात तिरंगा विकत घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

 

तिसऱ्या टप्प्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घर, कार्यालय, वाहनावर तिंरगा फडकावणे, सेल्फी व फोटो harghartiranga.com वर अपलोड करणे, ध्वजारोहण समारंभ, कार्यक्रामाचे प्रसारण व प्रसिध्दी करण्यात येणार आहे. यात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या