जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग तपासणी शिबीर १५ ऑगस्ट रोजी रद्द

 

जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग तपासणी शिबीर १५ ऑगस्ट रोजी रद्द

बुलडाणा, (जिमाका) दि. 11 :  जिल्हा रुग्णालय, बुलडाणा येथे नियमितपणे प्रत्येक शुक्रवारी नेत्र, मतिमंद/मनोरुग्ण आणि कान-नाक-घसा संबंधी दिव्यांग तपासणी बोर्ड कार्यरत असतो. मात्र येत्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी (तिसरा शुक्रवार) स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय सुटी असल्यामुळे नियोजित तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे.

रुग्णालय प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, या दिवशी संबंधित तपासणीसाठी रुग्णालयात येऊ नये. अन्यथा झालेल्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या