वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष ॲड निलेश हेलांडे(पाटील) यांचा जिल्हा दौरा
वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष ॲड निलेश हेलांडे(पाटील) यांचा जिल्हा
दौरा
बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : कै.वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलांडे (पाटील) हे
बुधवार दि. 6 ऑगस्ट 2025 रोजी बुलढाणा जिल्हा
दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे.
बुधवार दि. 6 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता विश्रामगृह संग्रामपुर येथे
आगमन व तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी
यांच्या समवेत तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व चारा लागवड यासंबंधी चर्चा. दुपारी
3.30 वाजता तहसिलदार, संग्रामपूर यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास
भेट. तद्नंतर तहसिलदार संग्रामपूर यांनी निश्चित केलेल्या प्रस्तावित चारा लागवडीचे
ठिकाणास भेट व पाहणी. सायं. 5 वाजता विश्रामगृह, शेगांव, जि. बुलढाणा येथे आगमन व तहसिलदार,
गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत तालुक्यातील
शेतकरी आत्महत्या व चारा लागवड यासंबंधी चर्चा.
5.15 वाजता तहसिलदार, शेगांव यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त
कुटूंबास भेट. तद्नंतर तहसिलदार शेगांव यांनी निश्चित केलेल्या प्रस्तावित चारा लागवडीचे
ठिकाणास भेट व पाहणी. सायंकाळी 7 वाजता विश्रामभवन, शेगांव येथे आगमन व मुक्काम. गुरुवार
दि.7 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता बाळापुर जि.अकोलाकडे प्रयान करतील.
000000
Comments
Post a Comment