लोणार येथील अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु

 

लोणार येथील अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु

 

बुलढाणा,दि.20 (जिमाका) :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग अंतर्गत लोणार येथील अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळेत सन 2025-26 करीता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता सहावी ते दहावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवर्गनिहाय अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, विजाभज  5 टक्के, दिव्यांग 3 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के प्रवर्ग निहाय आरक्षित जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, लोणार गृहपाल यांनी केले आहे.

00000

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या