दिव्यांग व जेष्ठ नागरीकांसाठी तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन

 

दिव्यांग व जेष्ठ नागरीकांसाठी तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : बुलढाणा  जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती व 60 वर्षा वरील जेष्ठ नागरीक यांचे कृत्रीम अवयव व आवश्यक साधणाकरीता तपासणी शिबाराचे आयोजन तालुकास्तरावर करण्यात आले आहे. दि. 19 ते 31 मे 2025 दरम्यान सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत संबंधित तालुक्याच्या शिबीराच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्ती व 60 वर्षा वरील जेष्ठ नागरीकांचे तपासणी करण्यात येणार आहे. तरी शिबीरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

तालुकानिहाय शिबीर याप्रमाणे : मंगळवार दि. 20 मे रोजी चिखली तालुक्यातील अपंग विद्यालय, बुधवार दि. 21 मे रोजी मेहकर तालुक्यातील विवेकानंद आश्रम हिवरा आश्रम मेहकर, गुरुवार दि. 22 मे रोजी लोणार तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, शुक्रवार दि. 23 मे सिंदखेड राजा तालुक्यातील जिजामाता मुकबधीर विद्यालय,  शनिवार दि. 24 मे रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील संत ज्ञानेश्वर मुकबधीर विद्यालय दे.मही, रविवार दि. 25 मे रोजी मोताळा तालुक्यातील पंचायत समिती सभागृह, सोमवार दि. 26 मे रोजी मलकापूर तालुक्यातील भ.महावीर मुकबधीर विद्यालय वसतिगृह, मंगळवार दि. 27 मे रोजी नांदुरा तालुक्यातील पंचायत समिती सभागृह, बुधवार दि.28 मे रोजी खामगाव तालुक्यातील  मुकबधीर विद्यालय, गुरुवार दि. 29 मे रोजी शेगावा तालुक्यातील मतीमंद विद्यालय, शुक्रवार दि. 30 मे रोजी जळगाव जामोद तालुक्यातील पंचायत समिती सभागृह, व शनिवार दि. 31 मे रोजी संग्रामपूर तालुक्यातील पंचायत समिती सभागृह येथे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्ती व 60 वर्षा वरील जेष्ठ नागरीक यांनी या याजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या