मानसशास्त्रीय कसोट्याचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी लाभ घ्यावा

 

मानसशास्त्रीय कसोट्याचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी लाभ घ्यावा

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामार्फत इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रीय कसोट्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य यांनी केले आहे.

 

मार्च २०२५ पासून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, देवी मंदिर जवळ, बुलढाणा येथे मानसशास्त्रीय कसोट्या उपलब्ध असून अनेक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. या कसोट्यांचा उद्देश विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता, अभिरुची, व्यक्तिमत्त्व आणि करिअर निवडीसाठी योग्य मार्गदर्शन करणे हा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा. ही सेवा पूर्णतः निःशुल्क असून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.अधिक माहितीसाठी डॉ. एस. डी. डुकरे, वरिष्ठ अधिव्याख्याता, मोबाईल क्र.- 9422182172 /Email - diet.bul@gmail.com/ Website- www.dietbuldhana.com  वर संपर्क साधावा .

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी