जिल्हाधिकारी कार्यालयात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा

 



जिल्हाधिकारी कार्यालयात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा

 

बुलढाणा,दि.21 (जिमाका) :  जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा करण्यात आला.

 

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा करण्यात येतो. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार व उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ’ दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी