कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा उपक्रम; "डिजिटल शेती शाळा"

 

कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा उपक्रम; "डिजिटल शेती शाळा"

 

               बुलडाणा, (जिमाका) दि. 23 :  शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शाश्वत शेती पद्धती, जलसंधारण आणि उत्पादनवाढ यासाठी कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "डिजिटल शेती शाळा" हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सक्रियपणे सहभाग घेऊन शेतीत नवे तंत्र आत्मसात करून अधिक उत्पादनक्षम व पर्यावरणस्नेही शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

              या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामान बदलाचे व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, सेंद्रिय खतांचा वापर आणि पाण्याचा शाश्वत वापर याबाबत प्रशिक्षण देणे हा आहे. डिजिटल माध्यमातून उपलब्ध असलेल्या या प्रशिक्षणामुळे शेतकरी घरबसल्या ज्ञान घेऊ शकतील व आपल्या शेतीमध्ये सकारात्मक बदल घडवू शकतील. "डिजिटल शेती शाळा" उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा www.digitalkhetishala.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

 

डिजिटल शेतीशाळा वेळापत्रक 2025

 

पिक

वेळ

सुरु होण्याची तारीख

झूम आयडी व पसकोड

सोमवार

बाजरी

सायं.6:15 ते 7:15

26 मे

ID : 89845701136 Passcode : 624786

मंगळवार

खरीप ज्वारी

सायं.6:15 ते 7:15

27 मे

ID : 89024794378 Passcode : 237266

बुधवार

भात

सकाळी 10 ते 12

28 मे

ID : 83942449675 Passcode : 445624

गुरुवार

घेवडा(राजमा)

सायं.6:15 ते 7:15

29 मे

ID : 87366079713 Passcode : 626140

शनिवार

भाजीपाला

सायं.7:30 ते 9:30

24 मे

ID : 83989924758 Passcode : 689151

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या