बुलढाण्यात प्रथमच फुटबॉल नर्सरी सुरू; 8 ते 16 वयोगटासाठी मोफत प्रशिक्षण

 बुलढाण्यात प्रथमच फुटबॉल नर्सरी सुरू; 8 ते 16 वयोगटासाठी मोफत प्रशिक्षण

 

बुलढाणा,दि.14 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा अंतर्गत जिल्ह्यामध्ये प्रथम फुटबॉल खेळाची नर्सरी सुरू करण्यात येत आहे.नर्सरीमध्ये वयोगट 8 ते 16 वर्षवयातील खेळाडूंना मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून वयोगटातील सर्व खेळाडूंनी फुटबॉल नर्सरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस. महानकर यांनी केले आहे.

जागतिक स्तरावर फुटबॉल खेळाचे सम्राज्य बघता आपल्या देशात, राज्यात व जिल्ह्यामध्ये फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, तसेच जिल्ह्यातील वयोगट 8 ते 16 वयातील फुटबॉल खेळाडुंनमध्ये फुटबॉल या खेळाची आवड निर्माण व्हावी व तंत्रशुध्द प्रशिक्षण त्यांना प्राप्त व्हावे, हे उद्दीष्ट डोळया समोर ठेऊन फुटबॉल नर्सरीच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम राबविण्यात आले आहे. आतंरराष्ट्रीय ऑलंपिक दिनाचे औचित्य साधून जिजामाता स्टेडीयम, विश्रामगृह समोर, बुलढाणा येथे दि.23 जून 2025 पासून सायंकाळी 5 ते 7 या वेळेत फुटबॉल खेळाचे विनामुल्य तंत्रशुध्द प्रशिक्षण सुरु करण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शाळा, विद्यालय, संघटना, फुटबॉल क्लब व पालकांनी आपल्या खेळाडूंना फुटबॉल नर्सरीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आपले नाव नोंदणी करून आपला प्रवेश दि.15 जुन 2025 पर्यंत निश्चित करावा. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. जीवन मोहोड (मो. नं. 9405734403) व क्रीडा अधिकारी संदीप केळे (मो.नं. 9423446516) यांच्याशी कार्यालयीन दिवशी संपर्क साधावा.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या