पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील धोत्रानाईक, वरवंड व धानोरी गावासाठी टँकर मंजूर
पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील धोत्रानाईक, वरवंड व धानोरी गावासाठी टँकर मंजूर
बुलडाणा,
(जिमाका) दि. 26 : पाणी
टंचाईची तीव्रता लक्षात घेता चिखली तालुक्यातील धोत्रानाईक, वरवंड व धानोरी या तिन
गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून
दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती चिखली उपविभागीय
अधिकारी यांनी दिली.
धोत्रानाईक येथे 1 हजार 200 पशुधन व 2 हजार 438 लोकसंख्येसाठी
एक टॅंकरद्वारे 72 हजार 760 लिटर्स, वरवंड येथे 850 पशुधन व 8 हजार लोकसंख्येसाठी दोन
टँकरव्दारे 1 लाख 77 हजार लिटर्स, तर धानोरी येथे 600 पशुधन व 1 हजार 55 लोकसंख्येसाठी
एक टँकरव्दारे 75 हजार 300 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता
टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात
यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर
नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी
प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
Comments
Post a Comment