पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेडराजा तालुक्यातील सोयंदेव गावासाठी टँकर मंजूर
पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेडराजा
तालुक्यातील सोयंदेव गावासाठी टँकर मंजूर
बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात
घेता सिंदखेडराजा तालुक्यातील सोयंदेव गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्याकरिता
टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी
पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी अजित दिवटे
यांनी दिली.
सोयंदेव गावातील 2 हजार 999
पशुधन व लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 57 हजार 180 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार
आहेत. पाणी टंचाईची
तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने
केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे
गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे
टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे
कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment