पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील सैलानी नगर गावासाठी टँकर मंजूर

 

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली  तालुक्यातील सैलानी नगर गावासाठी टँकर मंजूर

    बुलडाणा, (जिमाका) दि. 13 : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता चिखली तालुक्यातील सैलानी नगर गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती बुलढाणा उपविभागीय अधिकारी यांनी दिली.

सैलानी नगर येथे 325 पशुधन व 4 हजार 500 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 94 हजार 200 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत.  पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या