डाक विभागामार्फत "ग्यान पोस्ट" सेवा सुरु; नागरिक व विद्यार्थ्यांनी सुविधाचा लाभ घ्यावा
डाक विभागामार्फत "ग्यान
पोस्ट" सेवा सुरु; नागरिक व विद्यार्थ्यांनी सुविधाचा लाभ घ्यावा
बुलडाणा,
(जिमाका) दि. 7 : डाक विभागामार्फत बदलत्या काळानुसार नवनवीन योजना, सेवा
नागरिकांच्या सेवा देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र दिनाच्या निमित्त
"ज्ञान पोस्ट" ही नवीन सेवा सुरु केली आहे. या सेवांतर्गत पुस्तक, शैक्षणिक
साहित्य रास्त दरात पाठविता येणार असून या सेवाचा लाभ विद्यार्थी, नारिकांनी लाभ घ्यावा,
असे आवाहन अधीक्षक डाकघर बुलढाणा विभाग गणेश आंभोरे यांनी केले आहे.
शाळा, पुस्तक प्रकाशक, सरकारी शैक्षणिक संस्था, खाजगी शैक्षणिक
संस्था, लेखक, समिक्षक व इतर साहित्य पाठऊ शकणार आहे. यामध्ये कमीत कमी 300 ग्राम व
जास्तीत जास्त 5 किलो वजनाचे पुस्तक पाठविण्याची व्यवस्था आहे. सोबतच आपण बूक केलेले
पुस्तकाचे वितरण होईपर्यंत ट्रॅक अँड ट्रेसची सुविधा देण्यात आली आहे. पुस्तक वाचकास
भेटल्यानंतर पुस्तक पोहचल्याची पावती सुद्धा पाठवणाऱ्यास मिळणार आहे. त्यासाठी लागणारे
दर ही रास्त आहेत. त्यामुळे सर्व शाळा, पुस्तक प्रकाशक, सरकारी शैक्षणिक संस्था, खाजगी
शैक्षणिक संस्था, लेखक, समिक्षक व इतरांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन
करण्यात आले आहे.
000000
Comments
Post a Comment