पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील हनवतखेड, गिरडा, मढ गावासाठी टँकर मंजूर

 पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील हनवतखेड, गिरडा, मढ गावासाठी टँकर मंजूर

 

    बुलडाणा, (जिमाका) दि. 14 : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलढाणा तालुक्यातील हनवतखेड, गिरडा, मढ या तिन गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती बुलढाणा उपविभागीय अधिकारी यांनी दिली.

 

हनवतखेड येथे 147 पशुधन व 397 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 13 हजार 820 लिटर्स, गिरडा येथे 255 पशुधन व 940 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 20 हजार 900 लिटर्स व मढ येथे 425 पशुधन व 2134 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 30 हजार 900 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत.  पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या