मोताळा शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिव राज्यभिषेक दिवसाचे आयोजन

 

मोताळा शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिव राज्यभिषेक दिवसाचे आयोजन

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 30: सेवागिरी बाबा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोताळा येथे शुक्रवार दि. 6 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता शिवराज्यभिषेक दिवस साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमात संस्थेतील माजी प्रशिक्षणार्थी मेळावा व स्थानिक उदयोजक सहभागी होणार आहेत.

 

विभागाचे मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांचे संकल्पनेतुन सदर कार्यक्रम साजरी करण्यात येत असुन नागरिकत्व आणि शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचारांचा प्रसार, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संरक्षण या विविध विषयावर मान्यवर वक्ते यावेळी प्रबोधन करणार आहेत. सदर कार्यक्रमात मोताळा व परीसरातील सर्व नागरीक, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस.डी. गंगावणे यांनी केलेले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी