पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

 पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

 

बुलढाणा,दि.14 (जिमाका) : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे गुरुवार व शुक्रवार दि. 15 व 16 मे 2025 रोजी दोन दिवसीय बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार गुरुवार दि. 15 मे रोजी मुंबई येथून शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे सोईनुसार आगमन व राखीव. शुक्रवार दि. 16 मे रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह येथे अभ्यांगतांसाठी राखीव, दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक व  दुपारी 3.30 वाजता खरीप आढावा(2025-26)  बैठकीला उपस्थिती. बैठकीनंतर शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे राखीव. त्यानंतर सोईनुसार पुणेकडे रवाना होतील.

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी