शासकीय अध्यापक महाविद्यालयात कंत्राटी पदभरती

 

शासकीय अध्यापक महाविद्यालयात कंत्राटी पदभरती

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 :  शासकीय अध्यापक महाविद्यालयाकरीता आर्थिक वर्ष 2025-2026 या कालावधीकरीता एक सफाई कामगार आणि पहारेकरी अशी 2 पदे कत्रांटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. यासाठी आवेदनपत्र मागविण्यात आले आहे.

 

पद भरतीसाठी विहित आवेदनपत्र शासनमान्य कंत्राटदार, पंजीकृत बेरोजगाराच्या सेवा सहकारी संस्था, लोकसेवा केंद्राकडून द्वि-लिफाफा पद्धतीने मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहे. महाविद्यालयाकडे प्रति शेड्युल 500 रूपयांचा भरणा करून दि. 23 ते 27 जून 2025 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मिळू शकतील. दि. 29 मे 2025 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत मोहोरबंद निविदा स्विकारण्यात येतील. तसेच मोहोरबंद निविदा दि. 30 जून 2025 रोजी दुपारी 12  वाजता प्राचार्यांचे दालनात उघडण्यात येतील. त्यावेळेस संबंधित निविदाधारकांनी प्राचार्यांच्या दालनात दुपारी 12 वाजता उपस्थित राहावे, यासंबंधी अंतिम निर्णय प्राचार्यांचे राहणार आहे. सदर निविदा महाविद्यालयाचे संकेतस्थळ gcebedbuldan.org.in वर उपलब्ध आहे, असे शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एन.बी. चव्हाण यांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी