मान्सूनपूर्व काळात घ्यावयाची खबरदारी
मान्सूनपूर्व काळात
घ्यावयाची खबरदारी
बुलडाणा, (जिमाका), दि. 28 : सामान्यतः मान्सून देशात 7 जूनपासून दाखल होतो. मात्र, प्रादेशिक हवामान केंद्र,
नागपूर यांच्या माहितीनुसार यावर्षी मान्सून 1 जूनपासूनच सुरु होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नागरिकांनी पुढील खबरदारीचे उपाय अवलंबणे आवश्यक आहे.
खबरदारीचे उपाययोजना : पावसादरम्यान
आणि वीज चमकत असताना घराबाहेर जाणे टाळा. स्वतःच्या आणि आपल्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी
खालील मोबाईल अॅप्सचा वापर करा.
> दामिनी अॅप- वीज पडण्याच्या घटनांपासून संरक्षण
करण्यासाठी उपयोगी.
> मेघदूत अॅप - हवामान आधारित शेती व्यवस्थापनासाठी
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त.
> सचेत अॅप - आपल्या स्थानानुसार आपत्तीपूर्व
सूचना मिळवण्यासाठी मदत करते.
> भुकंप अॅप: भूकंप होण्यापूर्वी सूचना देणारे
अॅप.
आपत्तीजन्य परिस्थिती टाळण्यासाठी
व सुरक्षित राहण्यासाठी वरील अॅप्स आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्यांचा वापर करावा.
सर्व नागरिक व शेतकऱ्यांनी सजग राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी
सुहासिनी गोणेवार यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment