मेहकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

 

मेहकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

 

बुलढाणा,दि.28 (जिमाका) :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मेहकर येथील वसतिगृहात शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता  प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. मागासवर्गीय प्रवर्ग निहाय आरक्षित टक्केवारीनुसार अनुसूचित जाती, जमाती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजाभज इत्यादी प्रवर्गातील शालेय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन तसेच व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रवेश अर्ज करण्यास पात्र राहतील. वसतीगृहात प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह मेहकर येथील शासकीय वसतीगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेबआंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या