Posts

Showing posts from May, 2025

शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

  शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी ; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन   बुलढाणा,दि. 31 (जिमाका) : शेतीतून अधिकाधिक उत्पादनासाठी निविष्ठांची (बियाणे, खते व किटकनाशके) गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांनी निकृष्ट, भेसळयुक्त अथवा अनधिकृत उत्पादनांपासून बचाव करण्यासाठी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.   बियाणे, खते व किटकनाशके फक्त अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. दर्जा व गुणवत्ता हमीसाठी सरकारने मान्यता दिलेल्या विक्रेत्यांकडूनच निविष्ठा खरेदी कराव्यात, खरेदीची पावती घेणे आवश्यक असून विना पावती खरेदी केल्यास तक्रार करण्याचा हक्क नाकारला जाऊ शकतो म्हणून बियाण्याचे पाकिट सिलबंद, लेबलयुक्त व मोहरबंद असावे. पिशवी, टँग आणि पावती पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी, बियाणे व किटकनाशके खरेदी करताना त्यांच्या वापरण्याच्या अंतीम मुदतीची खात्री करावी, किंमत व वजनात फसवणूक टाळा, छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री अथवा कमी वजन दिल्यास त्वरित कृषि विभागाशी संप...

मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांचा जिल्हा दौरा

  मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांचा जिल्हा दौरा   बुलढाणा,दि. 31 (जिमाका) : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड हे रविवारी दि. 1 जून 2025 रोजी मेहकर, जि. बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.   त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार यवतमाळ येथून सकाळी 10.30 वाजता शासकीय निवासस्थान मेहकर जि. बुलढाणा येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता शासकीय निवासस्थान, मेहकर येथून ता. माजलगाव जि. बिडकडे प्रयाण करतील. 00000

भारतीय रेल्वेचा उपक्रम; ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ विशेष ट्रेनचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

Image
  भारतीय रेल्वेचा उपक्रम ; ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ विशेष ट्रेनचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन   बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : रेल्वे पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. युवक, विद्यार्थी, इतिहासप्रेमी व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.     ही यात्रा भारत गौरव टुरिस्ट ट्रेन (भारत गौरव टुरिस्ट ट्रेन) अंतर्गत 9 जून रोजी मुंबई येथून सुरू होत आहे.   या 5 दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांना अनुभव घेता येणार आहे.     ही केवळ एक यात्रा नसून, आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशा...

जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

Image
  जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी   बुलडाणा, (जिमाका) दि. 31 :   राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी   होळकर यांची   जयंती आज   जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. नायब तहसीलदार संजय बंगाळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी   होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 00000

जिल्हा कारागृहात मार्गदर्शक शिबीर संपन्न

  जिल्हा कारागृहात मार्गदर्शक शिबीर संपन्न   बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणामार्फत गुरुवार   दि. 29 मे 2025 रोजी सकाळी बुलढाणा जिल्हा कारागृहात येथे मार्गदर्शक शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बंद्याना नशामुळे होणारे दुष्परीणाम संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.   राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांचे ड्रग्ज मुक्त भारतासाठी ड्रग्ज जागरूकता आणि निरोगीपणा 2025 मधील निर्देशानुसार मार्गदर्शक शिबीर घेण्यात आले होते. शिबीराच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा सहदिवाणी न्यायाधीश सचिव नितीन पाटील उपस्थित होते. तसेच मानसोपचार तज्ञ डॉ. विश्वास खर्चे, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त गजानन घिरके, संदीप पांचाळ, अॅड. संदीप टेकाळे हे मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते.   शिबीरामध्ये डॉ विश्वास खर्चे यांनी कारागृहातील बंद्यांना नशा करण्याचे आरोग्यावर दुष्परीणाम, तसेच नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींनी परावृत्त होण्याकरीता काय करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. गजानन घिरके यांनी सुध्दा कारागृहातील बंद्यांन...

मोताळा शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिव राज्यभिषेक दिवसाचे आयोजन

  मोताळा शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिव राज्यभिषेक दिवसाचे आयोजन   बुलडाणा, (जिमाका) दि. 30: सेवागिरी बाबा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोताळा येथे शुक्रवार दि. 6 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता शिवराज्यभिषेक दिवस साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमात संस्थेतील माजी प्रशिक्षणार्थी मेळावा व स्थानिक उदयोजक सहभागी होणार आहेत.   विभागाचे मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांचे संकल्पनेतुन सदर कार्यक्रम साजरी करण्यात येत असुन नागरिकत्व आणि शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचारांचा प्रसार, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संरक्षण या विविध विषयावर मान्यवर वक्ते यावेळी प्रबोधन करणार आहेत. सदर कार्यक्रमात मोताळा व परीसरातील सर्व नागरीक, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस.डी. गंगावणे यांनी केलेले आहे. 00000

मोताळा शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

  मोताळा शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश प्रक्रिया सुरु   बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : सेवागिरी बाबा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोताळा जि.बुलढाणा येथे प्रवेश सत्र 2025-26 करीता वायरमन फिटर, आयसीटीएसएम, प्लंबर, वेल्डर, कोपा, शिवणकाम (ड्रेसमेकिंग), ब्युटी पार्लर (कॉस्मोटोलॉजी) या एक व दोन वर्षीय 240 जागेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेले आहे. प्रवेश अर्ज https:admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.   संपुर्ण प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन सत्र संस्थेत रोज सुरू आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांनी मोठ्या संख्येने ऑनलाईन अर्ज करून प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस.डी. गंगावणे यांनी केलेले आहे. 00000

फलोत्पादन योजनासाठी शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावे

  फलोत्पादन योजनासाठी शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावे   बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2025-26 अंतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाकरीता विविध घटकांतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in वर अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. संत्रा पुर्नज्जीवन, ड्रगन फ्रुट, अंळबी बिज उत्पादन केंद्र स्थापन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट, हरीतगृह, यांत्रिकिकरण, पॅक हाऊस, शितगृह, रेफर व्हॅन, कांदाचाळ इत्यादी बाबींसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रे :   लाभार्थीच्या नावे ७/१२ असणे आवश्यक आहे, (७/१२ मध्ये फळपिकाची नो...

खामगांव औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

  खामगांव औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु   बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : खामगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश इच्छुक दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यानी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा, असे आवाहन सतगुरू श्री अगाशे काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगांवचे प्राचार्य व्हि.व्हि. काळे यांनी केले आहे. दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यानी Admission.dvet.gov.in या संकेत स्थळावर जाउन ऑनलाईन पदधतीने अर्ज सादर करावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहीती पुस्तीका ऑनलाईन स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवुन झाल्यावर उमेदवारांनी नजिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन आपला अर्ज निश्चित करावा.  त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्याबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये समुपदेशन करण्यात येते. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसायाची माहीती देण्यात येते. सतगुरू श्री अगाशे काका औद्योगिक...

2 जूनला लोकशाही दिन

  2 जूनला लोकशाही दिन   बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार मे महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 2 जून 2025 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे.                लोकशाही दिनासाठी तक्रारदारांनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशाप्रकारे पाठवावेत, असे प्र. निवासी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी कळविले आहे. 00000

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: फळबाग लागवडीसाठी शासनाच्या विविध योजना

  जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: फळबाग लागवडीसाठी शासनाच्या विविध योजना   बुलढाणा,दि.29 (जिमाका) : बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवड आणि शाश्वत सिंचनासाठी शासनामार्फत विविध योजनेंतर्गत संधी उपलब्ध झाली आहे. आधुनिक शेतीकडे वाटचाल करत शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी जिल्ह्यातील हवामान व मातीचे पोत फळबाग लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांनी कृषी संबधित शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण   रोजगार हमी योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना,   राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनांअंतर्गत अनुदानावर आधारित फळबाग लागवड योजनाचा शेतकऱ्यांनी अर्ज करुन लाभ घ्यावा. लागवडीसाठी योग्य पिके: > फळपिके- आंबा, काजु, चिकु, पेरु,डाळिंब,संत्रा,मोसंबी,कागदी लिंबु, नारळ, बोर, सिताफळ, आवळा,चिंच, कवठ,जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी, बांबु, शेवगा, हदगा,केळी(3 वर्ष),   ड्रॅगनफ्रुट, ॲव्हाकॅडो, द्राक्ष, चंदन,   तुती, करवंद,खजुर, हनुमान फळ. > फुलझाडे-    गुलाब, म...

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

Image
  जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन          बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी जिल्हाधिकारी सुवासिनी गोणेवार, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड,   तहसीलदार विजय सवडे, वृषाली केसकर, जिल्हा नाझर गजानन मोतेकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 0000

मानसशास्त्रीय कसोट्याचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी लाभ घ्यावा

  मानसशास्त्रीय कसोट्याचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी लाभ घ्यावा   बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामार्फत इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रीय कसोट्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य यांनी केले आहे.   मार्च २०२५ पासून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, देवी मंदिर जवळ, बुलढाणा येथे मानसशास्त्रीय कसोट्या उपलब्ध असून अनेक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. या कसोट्यांचा उद्देश विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता, अभिरुची, व्यक्तिमत्त्व आणि करिअर निवडीसाठी योग्य मार्गदर्शन करणे हा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा. ही सेवा पूर्णतः निःशुल्क असून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.अधिक माहितीसाठी डॉ. एस. डी. डुकरे, वरिष्ठ अधिव्याख्याता, मोबाईल क्र.- 9422182172 /Email - diet.bul@gmail.com/ Website- www.dietbuldhana.com   वर संपर्क साधावा . 00000

मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा; पालकमंत्र्यांचे निर्देश प्रशासनाला फिल्डवर जाऊन कार्यवाही करण्याचे आदेश - ना.मकरंद जाधव-पाटील

  मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा; पालकमंत्र्यांचे निर्देश प्रशासनाला फिल्डवर जाऊन कार्यवाही करण्याचे आदेश - ना.मकरंद जाधव-पाटील   बुलडाणा, (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीपिके, फळबागा आणि काही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच वीज पडल्यामुळे जीवितहानी, पशुधन हानी तसेच रस्त्यांचेही नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक, कृषी सहायक आणि तलाठी यांनी संयुक्तपणे सर्वेक्षण करून पंचनामे तातडीने पूर्ण करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.   मान्सून कालावधीत प्रशासनाने कार्यालयीन चौकटीपलीकडे जाऊन थेट फिल्डवर जाऊन काम करावे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्रकरणांमध्ये शासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. ज्या ठिकाणी ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे, अशा गावांमध्ये संयुक्त सर्वेक्षणाची तरतूद आहे. त्यानुसार नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्या...