औषध जनजागृती कार्यशाळा संपन्न

 

औषध जनजागृती कार्यशाळा संपन्न

        बुलढाणा, दि. 28 (जिमाका): अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नुकतेच केमिस्ट भवन, चिखली येथे औषध जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औषधे व सौंदर्य प्रसाधन कायदा 1945, औषधे व आक्षेपार्ह कायदा, मेडीकल डिवायसेस कायदा 2017, नार्कोटेक व सायस्कोट्रीपीक सबस्टेशन कायदा, औषधे व चमत्कारीक उपचार, आक्षेपार्ह जाहिराती कायदा 1954 अशा विविध विषयावर सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

सहायक आयुक्त(औषधे) गजानन प्र. घिरके मार्गदर्शन करताना म्हणाले, एमटीपी किट, सिलडेनफिल बटन कॅप, अल्पोझ्रोनॉल, नायट्रोझेपान, इत्यादी महत्वाची औषधे विना बिल खरेदी करु नये. तसेच आरएमपी(RMP) डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी देऊ नये.  डॉक्टराच्या चिठ्ठीशिवाय औषधे विक्री करणाऱ्या पेढीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगीतले.

शिबिरामध्ये स्त्री भृणहत्या रोखणे, जास्त प्रमाणात अलौपॅथीक औषधांचे सेवन करणे, एफडीए सॉप्टवेअरचा अभ्यास करुन अप्रमाणीत औषधे विक्री करु नये, अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आले. कार्यशाळेसाठी चिखली तालुक्यातील केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट, या परिसरातील फार्मासिस्ट यांचा समावेश होता. मार्च महिन्यामध्ये देऊळगांव राजा, सिंदखेडराजा, दुसरबीड व डोणगांव या गावात सुध्दा केमिस्ट संघटनेची औषध जनजागर कार्यशाळा घेण्यात आले.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या