रविवारी (13 एप्रिल) “जय भीम पदयात्रा”;उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन

 रविवारी (13 एप्रिल) जय भीम पदयात्रा;उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन

बुलढाणा, (जिमाका) दि. 11 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंतीनिमित्य  जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,एन.एस.एस, एन.सी.सी., एन.वाय.के.एस, भारत स्काऊटस ॲण्ड गाईड व माय भारत स्वयंसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 13 एप्रिल 2025 रोजी  जय भीम पदयात्रेचे आयोजन सकाळी 7.00 वा. जिजामाता प्रेक्षागार येथून करण्यात आली आहे. सदर पदयात्रेला  मान्यवरांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ होईल.

      पदयात्रेचा मार्ग- जिजामाता प्रेक्षेगार -संगम चौक-जयस्तंभ चौक -एस.बी.आय. बॅक- जिजामाता प्रेक्षेगार येथे समारोप होईल. या पदयात्रेमध्ये शहरातील सर्व शैक्षणिक संस्थेमधील विद्यार्थी, शिक्षक व क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी विविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्‍ठीत नागरीक व सर्व सन्मानीय अधिकारी, कर्मचारी वृंद यांनी मोठया संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या