अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा जिल्हा दौरा

 अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा जिल्हा दौरा


बुलढाणा, (जिमाका) दि. 8 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम हे दि. 10 व 11 एप्रिल 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे.


गुरुवार दि. 10 एप्रिल रोजी नागपूर येथून रात्री शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे आगमन व मुक्काम.  शुक्रवार दि. 11 रोजी सकाळी 10 वाजता मुख्याधिकारी मलकापूर व शेगाव नगरपरिषद यांचे सोबत आढावा व कामाची पाहणी, भेटी व तपासणी. 


सकाळी 11 वाजता मुख्याधिकारी जळगाव जामोद नगरपरिषद यांचे सोबत आढावा व कामाची पाहणी,भेटी व तपासणी. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे साहेबराव मोतीराम इंगळे रा.अंगी(मलकापुर) ता. बाळापुर जि.अकोला यांच्या तक्रार निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अकोला यांचे सोबत आढावा बैठक. दुपारी 1.00 वाजता पंचफुलाबाई भिमराव जाधव व इतर रा.रताळी ता.सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा यांच्या तक्रार निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, सहायक आयुक्त समाज कल्याण बुलढाणा यांचे सोबत घटना स्थळी भेट व आढावा बैठक.

 

दुपारी 2 वाजता जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा व सहायक आयुक्त समाजलकल्याण बुलढाणा यांचे सोबत  सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा आढावा व बैठक.  दुपारी 2.30 वाजता मुख्याधिकारी देऊळगावराजा व सिंदखेडराजा नगरपरिषद यांचे सोबत आढावा व कामाची पाहणी,भेटी व तपासणी. 


दुपारी 3.30 वाजता मुख्याधिकारी नांदुरा नगरपरिषद आढावा, कामाची पाहणी, भेटी व तपासणी. दुपारी 4.30 वा. मुख्याधिकारी बुलढाणा नगरपरिषद यांचे सोबत आढावा व कामाची पाहणी, भेटी व तपासणी. दुपारी 5.30 वा. मुख्याधिकारी मेहकर नगरपरिषद यांचे सोबत आढावा व कामाची पाहणी, भेटी व तपासणी. त्यानंतर साईनुसार नागपूरकडे रवाना होतील. 

000000


Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या