डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूलमंत्र आचरणात आणून सामाजिक बदल घडवा - जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील

 


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूलमंत्र आचरणात आणून सामाजिक बदल घडवा

                                                                   - जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील

> सामाजिक समता सप्ताह उत्साहात साजरा

बुलढाणा,14 (जिमाका) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक ज्ञानाचे आणि प्रेरणा देणारे प्रतिक आहे. त्यांचे केवळ पुतळे न उभारता त्यांचे विचार, मूलमंत्र दैनंदिन जीवनात आचरणात आणून समाजात बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी आज येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयामार्फत सामाजिक न्याय भवन येथे सामाजिक समता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा जातपडताळणी समितीचे संशोधन अधिकारी मनोज मेरत उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील पुढे म्हणाले की,  आजच्या ज्ञानाच्या युगामध्ये सक्षम होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ‘शिक्षण’ हा मूलमंत्र दिला आहे. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान घेणे किंवा पुढचं शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करणे नाही. तर शिक्षण हा एक संस्कृतीचा, संस्काराचा भाग आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती साधावी आणि सामाजिक जीवनात बदल घडविण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाचा मूलमंत्र प्रत्येकाने आत्मसात करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यावेळी बोलतांना केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, जिल्हा जातपडताळणी समितीचे संशोधन अधिकारी मनोज मेरत यांनीही मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले.

००००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी