गिग व प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करा

 

गिग व प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करा

 

बुलढाणा, (जिमाका) दि. 3 : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने असंघटित कामकारांनासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध असून गिग व प्लॅटफॉर्म कामगारांनी पोर्टलवर नोंदणी करुन लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक कामगार अधिकारी यांनी केले आहे.

 

 असंघटित क्षेत्रातील कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यास त्यांना विनामूल्य अपघात विमा संरक्षण, सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ, सरकारी योजनांशी थेट जोडणी, तसेच भविष्यातील कल्याणकारी योजनांमध्ये समावेश होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नजीकच्या महा-ई सेवा केंद्र किंवा http://register.eshram.gov.in/#/user/platform-worker-ragistration या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी सरकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, हॉल क्रं.4(अ), बसस्थानका समोर बुलढाणा येथे संपर्क करावा.

 

 कोण नोंदणी करू शकतात : झोमॅटो, स्वीग्गी, ओला, अर्बन कंपनी, फ्लिपकार्ड, ऍमेझॉन व इतर कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणारे डिलीवरी बॉय, चालक, फ्रिलान्सर, घरगुती सेवा पुरवठादार व इतर तत्सम असंघटीत कामगार.

 

नोंदणीसाठी पात्रता: वयवर्ष 16-59 वयोगटातील असावा,आयकर भरणारा नसावा, इपीएफओ व इएसआयसीचे (EPFO व ESIC) सदस्य नसावे. 

 

आवश्यक कागदपत्रके :- आधार कार्ड, आधार कार्डशी लिंक असलेले मोबाईल नंबर, बँक खाते तपशिल. 

0000000

 

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या