पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील चार गावांसाठी टँकर मंजूर
पाणी टंचाई निवारणार्थ
चिखली तालुक्यातील चार गावांसाठी टँकर मंजूर
बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : पाणी टंचाईची
तीव्रता लक्षात घेता चिखली तालुक्यातील चार गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर
करण्यात आले आहे. यामध्ये धोडप, हिवरा नाईक, पळसखेड सपकाळ व किन्ही नाईक या ठिकाणी
ठरवून दिल्याप्रमाणे टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती चिखली उपविभागीय
अधिकारी यांनी दिली.
चिखली
तालुक्यातील धोडप गावात 998 पशुधन व 2 हजार 710 लोकसंख्येसाठी एक टॅंकरने 63 हजार
200 लिटर्स पाणी पुरवठा, हिवरा नाईक येथे 1 हजार पशुधन व 790 लोकसंख्येसाठी एक टॅंकरने
35 हजार 300 लिटर्स पाणी पुरवठा, पळसखेड सपकाळ येथे 498 पशुधन व 580 लोकसंख्येसाठी
एक टँकरने 21 हजार 560 लिटर्स पाणी पुरवठा तसेच किन्ही नाईक येथे 700 पशुधन व 2 हजार
470 लोकसंख्येसाठी एक टँकर 61 हजार 900 लिटर्स दररोज टँकरव्दारे पुरवठा करेल.
पाणी टंचाईची तीव्रता लक्षात
घेता या चार गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या
खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी
यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून
द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment