भूमि अभिलेख विभागामार्फत मंगळवारी शिबिराचे आयोजन; एकत्रीकरण योजनेंतर्गत शेतजमिनीचे अभिलेख नोंदी दुरुस्त करण्याची संधी

 

भूमि अभिलेख विभागामार्फत मंगळवारी शिबिराचे आयोजन;

एकत्रीकरण योजनेंतर्गत शेतजमिनीचे अभिलेख नोंदी दुरुस्त करण्याची संधी

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : भूमि अभिलेख विभागाकडुन मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण अधिनियम 1947 अन्वये एकत्रीकरण योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबविताना धारकांची नावे, त्यांचे क्षेत्र व गट क्रमांक नमुद करताना चुका झालेल्या आहेत. या चुका दुरुस्त करण्यासाठी दि. 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपासुन उप अधीक्षक भूमि अभिलेख, बुलढाणा शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अशिक्षक भूमी अभिलेख नरेंद्र झांबरे यांनी केले आहे.

 

मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण अधिनियम 1947 अन्वये हक्क नोंदणीवरील नोंदी, फेरफार व इतर अभिलेखांचे आधारे पुर्वीचे सर्व्हे नंबरचे पोटहिस्यांना गट क्रमांक देणेत येऊन गट नकाशा कायम करण्यात आलेले आहे. सदर योजना राबविताना धारकांची नावे, त्यांचे क्षेत्र, व गट क्रमांक हे नमुद करताना चुका झालेल्या आहेत. याबाबत नागरिकांना पुरेसे ज्ञान नसल्याने किंवा त्यांनी अभिलेखाची पडताळणी न केल्याने, मोजणी न केल्याने अश्या चुका आजरोजीही कायमच आढळुन येत आहेत. तसेच लक्षात येऊनही पुरेशा मार्गदर्शना अभावी चुका दुरुस्तीसंबंधी अर्जदार हे कार्यवाही करताना दिसुन येत नाही. भूमि अभिलेख विभागामार्फत 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांअंतर्गत अश्या लोकांसाठी दि. 29 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासुन उप अधीक्षक भूमि अभिलेख, प्रशासकीय ईमारत, 2 रा मजला, बस स्टँडसमोर बुलढाणा येथे मार्गदर्शनपर शिबीर घेण्यात येणार आहे. सदर दिवशी जमिनीचे 7/12, गट नकाशा, मोजणी नकाशा (तफावत असल्यास), 9 (3) 9(4), हक्कनोंदणी अभिलेख इत्यादी उपलब्ध अभिलेखासह हजर राहून मार्गदर्शन शिबीराचा लाभ घ्यावा.

0000000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या