मेहकर येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात सामाजिक समता सप्ताह उत्साहात साजरा
मेहकर येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात
सामाजिक समता सप्ताह
उत्साहात साजरा
बुलढाणा,15
(जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागाच्या अधिनस्त मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मेहकर येथे 8 ते 14 एप्रिल
दरम्यान सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात आला तसेच निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,
व इतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
समता सप्ताहाचे औचित्य
साधुन 8 एप्रिल या दिवशी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन कार्यक्रमाचे
उद्घाटन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत विद्यार्थीनींसाठी भाषणाचा कार्यक्रम आयोजित
करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृहातील विद्यार्थीनी स्नेहा सरोदे
(बी फार्म ) हिने केले. तर अध्यक्षपद गृहपाल संध्या देखणे यांनी भुषविले तसेच प्रमुख
अतिथी म्हणुन वसतिगृहातील विद्यार्थीनी खुशी पाटील (बी फार्म) हिने संविधानाविषयी मागदर्शन
केले. यावेळी गायत्री आवारे, अनुराधा माने, प्रिती तायडे, समीक्षा गवई या विद्यार्थीनीनी
आपल्या भाषणातून संविधानाचे महत्व विषद केले.
या सप्ताहा दरम्यान 11
एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ती महात्मा फुले
व सावित्रीबाई फुले यांची जीवनकार्यावर आधारीत बहुपर्यायी प्रश्नमंजुषा घेण्यात आली.
सदर उपक्रमामध्ये वसतिगृहातील 21 विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता त्यापैकी समीक्षा
गवई (बी फार्म ४ वर्ष) ही प्रथम क्रमांकाने तर संघमित्रा वानखेडे (बीएससी 1 वर्ष) द्वितीय
क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यात.
दिनांक 12 एप्रिल रोजी
महात्मा फुले, सावित्री बाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य तसेच भारतीय
संविधान या विषयांवर निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये समिक्षा गवई,
खुशी मुन (बी फार्म 4 वर्ष) यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला.
दिनांक 14 एप्रिल रोजी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त
विद्यार्थीनींनी भरभरुन आपले मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ बाबासाहेबांवर आधारीत गीत
गायन केले.
या सामाजिक समता सप्ताहात
वसतिगृहातील सर्व विद्यार्थीनींनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. तसेच वसतिगृहात कार्यरत
बाहयस्त्रोत कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्र.गृहपाल संध्या देखणे यांनी सर्वांचे
आभार मानुन समता सप्ताहाचा समारोप करण्यात आला.
000
Comments
Post a Comment