पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

 

पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

बुलढाणा,दि.4 (जिमाका) : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे  सोमवारी दि. 7 एप्रिल रोजी तीन दिवसीय बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार सोमवार दि. 7 एप्रिल रोजी मुंबई येथून सोईनुसार शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे आगमन व राखीव. मंगळवार दि. 8 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे टंचाई आढावा बैठकीस उपस्थिती, सायंकाळी 4 वाजता स्थानिक पदाधिकारी यांच्या बैठकीला उपस्थिती, बुधवार दि. 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह बुलडाणा येथे अभ्यागतांसाठी राखीव व त्यानंतर दुपारी कै. कैलास नागरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार आहेत. त्यानंतर सोईनुसार पुणेकडे रवाना होतील.

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या