खामगाव उप प्रादेशिक परिवहन येथे दुचाकी, चारचाकी वाहनासांठी नविन मालिका सुरु
खामगाव उप प्रादेशिक परिवहन येथे दुचाकी, चारचाकी वाहनासांठी नविन मालिका सुरु
बुलढाणा,दि.22 (जिमाका) : खामगाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी व
चारचाकी वाहनांसाठी आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी
क्रमांक घ्यावयाचा आहे अशा वाहनधारकांनी 24 एप्रिल, 2025 पर्यंत अर्ज सादर करावे, असे
आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
नवनिर्मीत उप प्रादेशिक परिवहन
कार्यालय खामगांव MH-56 येथे दुचाकी, चारचाकी, ऑटोरिक्षा, हलके मालवाहू व जडवाहन या
वाहनासांठी नविन मालिका सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना या वाहनांकरीता नियमीत
विहीत शुल्क भरुन तसेच तीनपट शुल्क भरुन आकर्षक/पसंती क्रमांक राखीव करावयाचे आहेत
त्यांनी दिनांक 24 एप्रिल रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते 2.30 या दरम्यान पसंतीचे
क्रमांकांच्या विहीत नमुन्यातील अर्जासह आधार कार्ड, रहिवाशी पत्ता पुरावा, पॅनकार्ड
या कागदपत्राच्या साक्षांकीत प्रती बंद लिफाफयात कार्यालयाच्या रोख विभागात जमा कराव्यात.
सदर लिफाफयावर वाहन मालकाचे नांव, वाहन वर्ग, पसंती क्रमांक व आधार लिंक मोबाईल क्रमांक
लिहीलेला असावा. एका नंबर करीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयीन
नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. लिलावाचे डी.डी. दि.24 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.30
वाजेपर्यंत स्वीकारले जातील. सदर अर्जासाठी त्याच दिवशी दुपारी 4.00 वाजता उप प्रादेशिक
परिवहन अधिकारी यांचे दालनात लिलाव करण्यात येईल. पसंती क्रमांकाकरीता महाराष्ट्र शासन
अधिसुचना दि. 30 ऑगस्ट 2024 नुसार विहित करण्यात आलेले सुधारीत शुल्क लागू राहील.
सदर डी.डी. उप प्रादेशिक परिवहन
अधिकारी खामगांव या नावाने राष्ट्रीयकृत/शेडयुल्ड बँकेचा असावा तसेच तो दोन महिण्यापेक्षा
जास्त नसावा. अन्य नावे असलेला डी.डी. स्विकारला जाणार नाही. त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची
साक्षांकीत प्रत जोडणे अनिवार्य राहील. लिलावाकरीता आकर्षक / पसंती क्रमांकासाठी मुळ
विहीत शुल्काचा एक डी.डी. व लिलावसंदर्भात जादा रकमेचा दुसरा डी.डी. असे दोन डी.डी.
आवश्यक राहतील. लिलावाच्या डी.डी.चे फक्त एकच पाकीट ग्राहय धरले जाईल. एकाच अर्जदाराने
एकाच क्रमांकाकरीता एकापेक्ष जास्त लिफाफे टाकल्याचे आढळून आल्यास असा अर्ज रद्द समजण्यात
येईल.
लिलाव प्रक्रियेत एखाद्या पसंती
क्रमांकाला समान रक्कमेचे डी.डी. प्राप्त झाल्यास असा क्रमांक अर्जदारांच्या नावाच्या
चिठ्ठया टाकून निश्चीत करण्यात येईल. सदर निर्णय सर्वाना लागू राहील. लिलाव सुरु असतांना
समोर अर्जदार उपस्थित असो अथवा नसो संपूर्ण लिलाव प्रक्रिया ही पूर्ण करण्यात येईल.
पसंती क्रमांकाच्या आगाऊ नोंदणीकरीता
उप प्रादेशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय खामगांव च्या कार्यक्षेत्रातील पत्ता असलेल्या
वाहनधारकांनीच अर्ज सादर करावेत. कार्यक्षेत्राबाहेरील तसेच चुकीच्या रकमेचा जोडलेला
डी.डी. चुकीचा वाहन वर्ग तसेच अचूक/आधार लिंक मोबाईल क्रमांक न लिहीलेले अर्ज बाद ठरविण्यात
येतील.
वाहन मालकास पसंतीच्या नोंदणी
क्रमांकाची विहीत शुल्क अदा करुन नोंदणी क्रमांक राखुन ठेवता येतो. महाराष्ट्र मोटार
वाहन नियम 1989 च्या नियम 54 अ नुसार राखून ठेवलेल्या पसंतीच्या नोंदणी क्रमांकाची
वैधता ही 180 दिवस असून नोंदणी क्रमांक राखून ठेवल्याच्या दिनांकापासून 180 दिवसाच्या
आत वाहन नोंदणीची प्रक्रीया पुर्ण झाली नसल्यास पसंती क्रमांकाची वैधता संपुष्टात येते.
त्यानंतर वैधता संपलेले पसंती क्रमांक पसंती क्रमांकाच्या पोर्टलवर उपलब्ध होऊन इतरांना
ते राखीव करता येतील.
सदर लिलावानंतर नविन मालिकेतील
उर्वरीत आकर्षक/ पसंती क्रमांक जनतेला सीटीझन पोर्टलवर विहीत शुल्क भरुन राखीव करता
येतील. उपरोक्त कालावधीमध्ये व पुढे त्यावेळी अस्तीत्वात असलेले शुल्क लागु राहील याची
नोंद घ्यावी. असे प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत खराबे यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment