पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगांव माळ गावासाठी टँकर मंजूर
पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगांव
माळ गावासाठी टँकर मंजूर
बुलडाणा,
(जिमाका) दि. 4 : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगांव
माळ गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे
सावरगांव माळ येथे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती सिंदखेडराजा
उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी दिली.
सावरगांव माळ येथे 325 पशुधन व 1 हजार 765 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे
39 हजार लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत.
पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले
आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी
नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित
दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे
कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment